
क्षण उरत नाही पण आठवणी मात्र उरतात.
क्षण संपले तरी आठवणी आयुष्य भर पुरतात.
क्षण सरतात पण आठवणी सरत नाही,
का सरत नाही माझं मलाच कळत नाही.
मनाच्या झाडाला आठवणींचे पानं असतात.
इतर झाडांप्रमाणे तेही खचतात.
खचले तरी मात्र ते कधीच झडत नाही,
का झडत नाही ते माझं मलाच कळत नाही.
मुसळधार पाऊसात तरी घर गळतं.
मोडलेल्या छपरावरणं ते लगेच कळतं
मन जरी मोडलेलं असलं तरी ते कधीच गळत नाही,
का गळत नाही माझं मलाच कळत नाही.......
No comments:
Post a Comment