Wednesday, October 29, 2008

एकदा तरी ...




एकदा तरी ...



हाक देईल शेवटची एकदा तरी साद देशील ना
नाही जमलं जिवनात, पण ... स्वप्नात तर येशील ना

थोडा राहीला प्रवास चालेल म्हणतो एकटा मि
नाहि सोबती माझ्या पण... सावलीला तर येशील ना

डोळ्यातील अश्रु पिऊन टाकीन सर्व आता
नाही पुसायला अश्रु पण पाजायला तर येशिल ना

पांघरुन काळी रात्र निजेल शांत कायमचा
स्वप्न मनी रंगन्या नाहि, पण... उषाला तर येशिल ना


एकदा.... एकदा तरी येशिल ना?


No comments: