Friday, June 3, 2011

पाऊस


पहिला पाऊस आला तुझी आठवण घेऊन
तुझ्या आठवणीने गेलो पुन्हा चिंब न्हाऊन !

सर्वकाही जुनंच होतं..!
तोच वारा, तीच झाडी, तेच आकाश आणि पाऊस हि तोच.
उंच डोंगर, भिजलेली पायवाट, ओली माती आणि तिला गंध हि तोच !

नव्हती तेव्हडी फक्त तूच...!
ए..., तुला आठवतं? हातात हात घालून भिजलो होतो पावसात
बरीच धमाल ही केली होती त्या पावसाळ्याच्या दिवसात !

तुला नसेल आठवत...!
तुला नसेल आठवत तरी मला मात्र आठवत सारं काही
ह्या जन्मी काय पुढची सात जन्म विसरणार नाही !

बहुतेक ,......!
बहुतेक , हा हि पावसाळा असाच जाणार
पण एकदा तरी तुला पावसाळ्यात माझी आठवण नक्की येणार ....!



No comments: