Wednesday, February 27, 2008

काळोख


अंधाराच्या आडोश्याला बसावस वाटतं।
कोमजलेल्या मंद प्रकाशात भिजावस वाटतं।

त्या मंद प्रकाशात काही आकृत्या नाचतांना दिसतात।
त्यात काही जुने क्षणं तर काही आठवणी असतात।

मग एक एक तो क्षण डोळ्या समोर येतो।
मला तिथेच ठेऊन मनाला मात्र भुतकाळात नेतो।

खरचं मन किती मोठ असतं याच नवल वाटत।
जेव्हा एवड्याशा मनात आठवणींच समुद्र साठतं।

अस वाटतं सारं काही विसरुन जाव।
अंधाराच्या कुशीत शांत निजाव।

पण वाटत तितक सोप नसतं।
कारण उशालाही आठवणींच गाठोड असतं......।

Monday, February 25, 2008

आठवणं


माझा एकांत आणि माझी आठवणं
सतत गोष्टी करत असतात.
आठवणींच्या गोष्टीत एकांत रमुन जातो.
तेव्हा उरते ति फक्त आठवणं।
त्याच जगात रहावं असं बर्‍याचदा वाटतं
पण भितीने आभाळ मनात दाटतं।
पाय तिथल्या समुद्रात गुढग्यापर्यंत भिजलेले असतातं
तेव्हा आठवणी दुर गेलेल्या जहाजागतं दिसतात।
सुर्यही असतोना, आरधा वर आरधा पाण्यात
तो हि कुठे जातो कळत नाही एक अर्ध्या क्षणातं
मग मि पुन्हा,मग मि पुन्हा चालत येतो जिथे मन संपते
वळुन पहाता रेतीवर पाऊलं उमटलेलं असतं
त्यावर्ण लाट जाते पुसून जातात खुना, त्यावर्ण लाट जाते पुसून जातात खुना
परत जातांना लाट मात्र आठवणी देते पुन्हा.....!